
आनंद वीर( प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात संततदार पाऊस होत असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.सध्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याने पर्यायी पूल करण्यात आले आहेत. परळी तालुक्यातील पांगरी या गावाजवळील पर्याय फुल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होते, आणि ओसरल्यावर तीन दिवसांनी हा पूल केल्यावर वाहतूक सुरळीत झाले होते, दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा परळी जवळ सेलू गावाजवळील पूल वाहून गेल्याने हसता वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना पर्यायी रस्ता वापरावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम होणे अपेक्षित होते, परंतु कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना व या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना होत आहे. पावसाचा जोर वाढत असून नदी,नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे पर्यायी पूल करणे देखील सध्यातरी अशक्य असल्याचे दिसत आहे.