
आनंद वीर(प्रतिनिधी) सध्या राज्य शासनाचे मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लाडके बहीण, लाडका भाऊ अशा योजना सुरू केल्या आहेत एसटी कर्मचारी अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी व विविध मागण्यासाठी भांडत आहेत तरीही त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने हे कर्मचारी सरकारचे लाडके नाहीत का? असा सवाल परिवहन महामंडळाचे कर्मचारी सरकारला व मुख्यमंत्र्याला करत आहेत.राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्याच्या मागण्याची पूर्तता गेल्या अनेक महिन्यांपासून झाली नसल्याने सर्वच कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला यात बीड जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी सहभागी होणार आहेत.एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये चालक,वाहक,यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचारी याच्या मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. यात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्यात यावे, डी.अँड डी. प्रोसिजर मधील जाचक अटी रद्द कराव्यात यासह अन्य मागण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. बीड जिल्ह्यातील एस.टी.कामगार संघटना, एस.टी.कामगार सेना, कस्ट्राइब संघटना, कष्टकरी जनसंघ व अन्य संघटना व अन्य असंघटित सर्व कर्मचारी सहभाग नोंदवणार असल्याचा दावा केला जात आहे. गणेशोत्सवासह इतर सण काही दिवसांवर आले असताना काम बंद आंदोलन केल्याने प्रवाशांना याचा फटका बसणार आहे