
आनंद वीर(प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील पांढरवाडी(रामपुरी)गावामध्ये मागील भांडणाची कुरापत काढून गावातीलच लोकांनी शेतात जात असताना एकट्याला पाहून बालाजी भगवान घरबुडे वय २६ वर्षे या तरुणावर आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळी पांढरवाडी गावातच पाच,सहा लोकांनी हल्ला करत, धारदार शस्त्राने सपासप वार केल्याने बालाजी घरबुडे गंभिर जखमी झाल्याने उपचारासाठी औरंगाबाद येथे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच बालाजी घरगुडे यांचा मृत्यू झाला मृतदेह बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालय समोर प्रेत ठेवण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर गेले असता खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाचे गेट बंद करण्यात आले.बालाजी घरबुडे हे लॉ कॉलेज औरंगाबाद येथे शिक्षण घेत होते.पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मागील दोन तासपासून मयत कुटुंब आक्रोशी व्यक्त करत पोलीस प्रशासनवर संताप व्यक्त केला. मागील दोन महिन्यापूर्वीच भांडण झाल्याने तलवाडा पोलीस ठाणे व बीड पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार व निवेदन देऊन आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती. परंतु तलवाडा पोलीस ठाणे पोलिसांनी त्यांना अटक व कारवाई न केल्यामुळेच आजचा खून झाल्याचे कुटुंबाने आरोप केला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय समोर दोन तासापासून कुटुंबातील सर्व आक्रोश करत आरोपींना तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी करत आहेत. आरोपींना अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा मयत कुटुंबाने घेतल्याने पोलीस अधीक्षक कार्यालसमोर जमावाने गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली.