रस्त्यासाठी तरुणाचे खड्ड्यात झोपून,रस्तारोको आंदोलनाला खासदाराची भेट!
बीड शहरातील तेलगाव नाका,गांधीनगर रस्त्यासाठी आंदोलन.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील रस्त्याची काम बऱ्या प्रमाणात झाले असून काही भागात मात्र लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. बीड शहरातील तेलगाव नाका,गांधीनगर भागात रस्ते,वीज,पाणी,नाल्या चां प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, या समस्या कडे लक्ष वेधून घेण्यासाठी तेलगाव नाकात चौकातच पत्रकार भागवत तावरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.नागरिकांनी वाहत्या पाण्यात झोपून नगरपालिका त्यांनी निषेध केला.यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी आंदोलन स्थळे जाऊन सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले.रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे, सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्या मध्ये पाणी साचून अपघात देखील झाले आहेत. तेलगाव नाका चौकातच आदित्य पॉलीटेक्निक, कृषी महाविद्यालय, गीता कन्या विद्यालय असून या खड्ड्याचा त्रास विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात बीड शहरात मुसळधार पाऊस झाल्याने या भागात नाल्या नसल्याने नागरिकाच्या घरात पाणी शिरल्याने स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेच्या विरोधात घोषणा देत संताप व्यक्त केला. तेलगाव नाकाचा कॉलेज रस्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती,त्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता