ताज्या घडामोडी
बीड शहरात रात्री गायीचे अपहरण कसे करतात व्हिडिओ पहा.!
गायी चोरणारास अडवल्याने मारहाण.

आनंद वीर(प्रतिनीधी) बीड शहरामध्ये मागील काही महिन्यापासून मुख्य रस्ता तसेच गल्लोगल्ली मोकाट जनावर दिसून येत आहेत.या जनावराचे रात्री अपहरण होत असल्याचां व्हिडिओ समोर आला आहे. बीड शहरातील सहयोगनगर भागात दि.31 ऑगस्ट रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास मालवाहू पिकअप मध्ये पाच,सहा गायीचे अपहरण केले असून या गाई कत्तलखान्यात विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सहयोग नगर मध्ये रात्री मालवाहू वाहनांमध्ये गायी टाकत असताना एका वॉचमनने त्या गाई चोरणाऱ्यास ,विचारणा करून अडवले असता त्याचा मोबाईल हिसकावून घेत त्या चोरांनी मारहाण करत.चोरांनी पाच हे सहा गायी चोरून घेऊन गेले. त्यामुळे या चोरांचा तपास करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोमाता रक्षक द्वारकाधीश संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरखुदे यांनी केली आहे.