गेवराईत दहीहंडी कार्यक्रमात गोंधळ,पोलिसांचा लाठीमार
आयोजकांनी बक्षीसाची रक्कम विजेत्या संघास न दिल्याने गोंधळ

आनंद वीर(प्रतिनीधी) गोकुळाष्टमी निमित्त गेवराई शहरांमध्ये दहीहंडी स्पर्धेचे आयोजन धोंडराई येथील सरपंच शितल साखरे यांनी दि.३ सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ७ वाजता गेवराई शहरातील बाजारतळ करण्यात आले होते. दहीहंडी विजेत्या संघास प्रथम बक्षीस म्हणून १,११,१११ द्वितीय बक्षीस३३,३३३ देण्यात येणार होते. या कार्यक्रमास गेवराई व परिसरातील हजारो प्रेक्षकानी उपस्थिती लावली होती. पैठणच्या राजे संभाजी क्रीडा मंडळने ही दहीहंडी फोडली. पहिल्याच टप्प्यात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता परंतु अचानक दहीहंडी वरती घेतल्याने दुसऱ्यांदा दहीहंडी फोडत गेवराई करांची मने जिंकत प्रथम बक्षीस मिळवले. तर आयोजकांनी हे बक्षीस दिले नसल्याने विजेत्या संघाने आयोजकावर नाराजी व्यक्त केली. विजेते समाज बक्षीस नसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. डीजे मालकाने हातात माईक घेऊन शिवराय भाषेमध्ये बोलत “गेवराईकरांनो तुम्हाला लाज वाटते का”असे बोलल्यानंतर गेवराईकर आक्रमक झाल्याचे दिसतात डीजे मालक सचिन नरवडे घटनास्थळावरून पळून गेला.या दहीहंडी कार्यक्रमा शेवटच्या क्षणी गोंधळ उडाल्याने पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी, गर्दी पांगवण्यासाठी सोम्य लाठीमार केल्याने प्रेक्षकांमध्ये धांदल उडाली, डीजे मालकाने आवाजाची मर्यादा ओलधल्याने आणि त्याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दहीहंडी विजेत्यास बक्षीस न दिल्याने त्यांनी मोबाईल बंद करून घटनास्थळावरून पसार झाल्याने सरपंच शितल साखरे यांनी दहीहंडीच्या नावाखाली लोकप्रियता मिळण्याचा, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केविलवाणा प्रयत्न केला असल्याची चर्चा गेवराई तालुक्यात रंगू लागली व आयोजकावर संतप्त भावना व्यक्त होत आहेत.