
आनंद वीर(प्रतिनीधी) राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश गावाजवळ स्विफ्टकारने मोटरसायकल स्वारास उडवल्याने दोघे गंभीर जखमी झाले त्यांना गावकऱ्यांनी उपचारासाठी बीडला पाठवण्यात आले.हा अपघात आज दि.५ सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश येथील सांज गारवा हाटेलजवळ स्विफ्ट कार (एम एच ४६ एक्स १०५५) पाटोद्यावरून मांजरसुंभ्याकडे जात असताना मोटार सायकल (वाहन क्रमांक एम एच २३ बी.डी. ५९३९) वरील पंकज नारायण बांगर व साथीदार अंकुश राजेंद्र बांगर रा.वाघिरा ता.पाटोदा मांजरसुंभ्याकडुन गावाकडे जात असताना समोरासमोर अपघात झाला.या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असुन,दोघांच्याही पाय फ्रॅक्चर झाले आहेत त्यांना जिल्हा रुग्णालय बीड येथे खाजगी वाहनाने पाठवण्यात आले. घटनास्थळी लिंबागणेश पोलिस चौकीचे पो.हे. संतोष राऊत आणि बाबासाहेब डोंगरे दाखल झाले असुन पुढील चौकशी करून कार चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मो.नं.८१८०९२७५७२