
बीड तालुक्यातील लिंबागणेश गावाजवळ स्विफ्ट कार व दुचाकीचा अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाले.हा अपघात(दि.५) आज दिं ५ गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता अहमदपूर ते हमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश येथील सांज गारवा हाटेल जवळ स्विफ्ट कार (एम एच ४६ एक्स १०५५) पाटोद्यावरून मांजरसुंभ्याकडे जात असताना मोटार सायकल (वाहन क्रमांक एम एच २३ बी.डी.५९३९) ला जोराची धडक दिल्याने पंकज नारायण बांगर व साथीदार अंकुश राजेंद्र बांगर रा. वाघिरा ता.पाटोदा मांजरसुंभ्याकडुन गावाकडे जात असताना समोरासमोर अपघात झाला.या अपघातात गंभीर जखमी झाले असुन, दोघांचेही पाय फॅक्चर झाल्यास डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाला होता सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे व सहकाऱ्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालय बीड येथे खाजगी वाहनाने पाठवण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी लिंबागणेश पोलिस चौकीचे पो.हे.संतोष राऊत आणि बाबासाहेब डोंगरे दाखल झाले असुन अपघात ग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला घेत चौकशी करून स्विफ्ट कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे करत आहेत.