धार्मिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकनेच केला११वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार
गुरु शिष्याच्या नात्याला काळींबा फासणारी बीड शहरातील घटना.

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड शहरातील मोमीनपुरा भागात धार्मिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने अकरा वर्षीय मुलीवर गेल्या अनेक दिवसापासून बलात्कार होत असल्याची धक्कादायक घटना आज दिनाक ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून निंदनीय कृत्याची तक्रार मुलीने आई-वडिलांकडे केल्यानंतर आई-वडिलांनी तात्काळ पेठ बीड पोलीस ठाणे गाठले असून पोलिसांना या घटनेची माहिती दिली व तात्काळ आरोपीला अटक करावी अशी मागणी केली. या प्रकरणीगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोमीनपुरा भागात असलेल्या एका शिक्षक खाजगी ट्युशन घेत होता त्याकडे एका अकरा वर्षीय मुलगी खाजगी शिकवणीसाठी जात होती. मात्र धार्मिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकानेच अल्पपवयीन मुलीवर सतत बलात्कार केल्याची माहिती मुलींनी आपल्या आई- वडिलांना दिल्यानंतर आई-वडिलांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची माहिती दिली व पेठ बीड पोलिसांनी तात्काळ त्या शिक्षकाला ताब्यात घेत गुन्हा दाखलकरण्याची प्रक्रिया सुरू केली, या प्रकरणाची माहिती मिळताच पेठबीडपोलीस ठाण्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, ही घटना निंदनीय असून समाजाला व गुरु शिष्याच्या नात्याला काळींबा फासणारी घटना आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पेठ बीड पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली असून अशा निंदनीय कृत्यामुळे धार्मिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकावर संताप व्यक्त होत आहे.नराधम शिक्षकावर पेठ बीड पोलीसt ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.