केज तालुक्यात ग्रामस्थांनीच संशयितरित्या फिरणारे चोर पकडले !
चोरांना चोप देत चारचाकीची केली तोडफोड

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये सध्या चोरांनी अक्षरश धुमाकूळ घातला असून रोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत.तसेच जिल्ह्यात रात्री ड्रोन घरट्या घालत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून अद्यापही पोलीस प्रशासनाला देखील या ड्रोन चा उलगडा करता आलेला नसल्याने नागरिकांच वातावरण पसरले आहे.दि.५ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील कानडी,कासारी,धर्माळा,साबला परिसरात ड्रोन घीरट्या घालत असल्याचे ग्रामस्थांना दिसले असता गावाच्या आजूबाबाजूला पाहिले असता एक काळी स्कार्पिओ संशयितरित्या फिरताना दिसली व त्यात तीन ते चार जणांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तरे दिल्याने संशयितरित्या गावकऱ्या कडून त्या चोरट्या्ना बेदम मारहाण करण्यात आली, त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले.व नागरिकांनी स्कार्पिओची तोडफोड करण्यात आली.त्या चोरट्याचे हातपाय बांधून ठेवले. या घटनेने या परिसरात चोरट्याची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली असून प्रत्येक गावातील नागरिक रात्र जागून काढत आहे. ड्रोन नेमके कोणाचे. कोण उडवतंय. कशासाठी उडवतय. त्याचा तपास सध्या पोलीस प्रशासनाने तत्काळ करावा अशी मागणी होत आहे.मात्र रात्री स्कार्पिओ मध्ये फिरणारे नेमके कोण आहेत याचा तपासाता होणं गरजेचं आहे. या घटनेमुळे केस तालुक्याच्यात भीतीचे वातावरण पसरले असून चोरांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.चोरांना ग्रामस्थानी बेदम चोप दिला पुढील तपास केज पोलीस करत आहेत.