
आनंद वीर (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात वाढत्याचोऱ्या,घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेला कन्हेेेेरवाडी घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे.या आरोपीकडून आणखीन गुन्हेउघडकीस आल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत मिळाली.कन्हेवाडी येथील खंड्डु हरीभाऊ सांगळे(वय२४) हे दिनाक २८ ऑगस्ट रोजी काही कामानिमित्त जामखेड येथे गेले असताना,आई,वडील देखील सकाळी शेतातील कामे करण्यासाठी गेले होते, अज्ञात चोरट्याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत सकाळी ११ते१२ वाजण्याच्या दरम्यान घरचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटाचे लॉक तोडुन सोने, नगदी पैसे असे एकुण २,५४,०००/- रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रामेश्वर जगल्या भोसले रा. पांडेगव्हाण, आष्टी ता.आष्टी जी.बीड यांनी केला आहे व तो सध्या त्याचे राहते घरी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घरी छापा मारून आरोपी रामेश्वर भोसलेला ताब्यात घेतले. त्याने घरफोडीच्या गुन्ह्यात असल्याची कबुली दिली असून अन्य तीन गुन्ह्यात देखील सहभागी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.ही कामगिरी बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पो. .उप-नि. श्रीराम खटावकर,अशोक दुबाले, दिपक खांडेकर, पो.ना. सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव,नामदेव उगले, सुनील राठोड स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.