बीड बायपास रस्त्यावर ट्रक लुटण्याचा प्रयत्न,ट्रकवर दगडफेक
डोक्याला मार लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट डिव्हायडरवर

वीर(प्रतिनीधी) सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग बीड बायपास रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ दिनाक 6 सप्टेंबर रोजी दिवसा ढवळ्या पाच वाजण्याच्या सुमारास अडवण्याचा प्रयत्न केला,परंतु ट्रक चालकाने ट्रक न थांबल्याने अज्ञातानी मोटरसायकल वरून येत दगडफेक केली त्यात ट्रक चालक जखमी होऊन, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट डिवायडरवर चढला,ट्रक ड्रायव्हरने ट्रक कंट्रोल केल्याने पलटी होण्यापासून वाचला,ट्रक चा वेग कमी असल्याने ट्रक डिव्हायडरवरच थांबला, नाहीतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहणारा धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता टळली. परंतु अज्ञाताने केलेल्या दगडफेकीमध्ये ट्रक चालकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता.याची माहिती आय. आर.बी.व बीड ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन ट्रक चालकची विचारपूस करून माहिती घेतली व ट्रक डिव्हायडर वरून बाजूला घेण्यास मदत केली.नंतर ट्रक निघून गेला.या बायपास रस्त्यावर सतत काही टोळके चालकाला अडवून पैसे व मोबाईल घेत लुटत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. परंतु कोणी कोणाला दाखल करण्यास तयार नसल्याने त्या टपोरीची हिम्मत वाढत चालली असून, यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्या टपोरी तोळक्याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा व त्यांना वेळीच शोधून कारवाई केली तरच अश्या घटनांना आळा बसेल.