
आनंद वीर (प्रतिनिधी) गणेशउत्सावाच्या पार्श्वभुमीवर MPDA कायद्याअंतर्गत बीड शहरातील एका धोकादायक गुंडाची हर्सल कारागृहात रवानगी केली.बीड जिल्हयातील सार्वजनिक सुव्यवस्था व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे गणेशउत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर योजिले आहे.त्या अनुषघांने पो.नि.प्रविण कुमार बांगर पोलीस ठाणे गेवराई यांनी दिनांक 09.07.2024 रोजी भीमा लक्ष्मण मस्के वय 42 वर्षे रा. पेठ बीड ता.जि. बीड याचे विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.सदर स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे गेवराई, तलवडा, पेठ बीड, शिवाजीनगर, धारुर. वडवणी, येथे चोरी करणे, चोरीच्या मालाची हेराफेरी करणे, घरफोडी करणे, पुरावा नष्ट करणे, जबरी चोरी करणे, रस्ता आडविणे, खुनाचा प्रयत्न करणे, गैर कायदयाची मंडळी जमविणे, दंगा करणे, दुखापत करणे वगैरे स्वरुपाचे एकुण 09 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी 05 गुन्हे न्यायप्रविष्ठ असुन 04 गुन्हे पोलीस तपासावर आहे. तसेच नमुद इसमावर त्याने आपली वर्तनुक सुधारावी म्हणुन यापुर्वी CrPC कलम 110 प्रमाणे अन्वये अनुक्रमे दिनांक 20/09/2023 व दिनांक 11/05/2024 रोजी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे करण्याची श्रृंखला चालुच ठेवुन होता. त्याची बीड व गेवराई शहरात व हद्दीत प्रचंड दहशत आहे. त्याचे विरुध्द लोक फिर्याद देण्यास अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत.तो सर्वसामान्य लोकांना त्रास देवुन दहशत निर्माण करुन व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचवत होता.सदर प्रकरणात बीड जिल्हा अधिकारी तथा न्यायदंड अधिकारी यांनी दिनांक06.09.2024रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए.कायद्या अंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सल कारागृह छ .संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध करणे बाबत आदेश पारीत केले आहेत. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पो.स्टे. गेवराई व पो.नी.स्था.गु.शा.बीड यांना दिल्या होत्या. त्यानंतर पो.नि.श्री. उस्मान शेख यांचे सुचनेवरुन पोउपनि मुरकुटे व त्यांचे टीमने सदर प्रस्तावित स्थानबद्ध इसमास दि.06.09.24 रोजी ताब्यात घेवुन पो.स्टे. गेवराई येथे हजर केले त्यांनतर पो.नि. गेवराई यांनी दिनांक 06.09.2024 रोजी सदर इसमास कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सल कारागृह, छ.संभाजीनगर येथे हजर करुन स्थानबध्द करणे कामी रवाना केले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अविनशा बारगळ, अ.पो.अ. बीड, सचिन पांडकर, उप.विपो.अ. गेवराई निरज राजगुरु पो.नि.उस्मान शेख स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रविणकुमार बांगर, स.पो.नि. जंजाळ, पोह/राजु भिसे पोना/विशाल कांबळे सर्व पो.स्टे. गेवरई तसेच पो.उप.नि. मुरकुटे, स.पो.उप.नि. अभिमन्यु औताडे, कैलास ठोंबरे, तुळशिराम जगताप, राहुल शिंदे, मनोज वाघ, विकास वाघमारे व चालक राठोड सर्व नेमणुक स्थागुशा बीड यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायदयाअंतर्गत आगामी गणेशउत्सव व विधानसभा निवडणुक संबंधाने कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिले आहेत.