रि.पा.ई.च्या बैठकीस उपस्थित राहावे.मायाताई मिसळे

आनंद वीर (प्रतिनिधी)-रि.पा.ई.च्या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.तरी जिल्ह्यातील पदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष,महिला आघाडी पदाधिकारी,शहर प्रमुख,युवा रि.पा.ई.पदाधिकारी,सर्कल प्रमुख व क्रियाशील पदाधिकारी,कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी व महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी युवा रिपाई प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.९) सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,नगर रोड बीड येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आले असून.रिपाई च्या वतीने या महत्त्वपूर्ण बैठकीस रि.पा.ई.चे जिल्हा पदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष,महिला आघाडी पदाधिकारी,युवा रि.पा.ई.पदाधिकारी,रि.पा.ई.बीड शहर पदाधिकारी, सर्कल प्रमुख,क्रियाशील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांनी रि.पा.ई.च्या वतीने आयोजित महत्वपूर्ण बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन रि.पा.ई.महीला आघाडी जिल्हा अध्यक्ष मायताई मिसळे बीड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.