
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत धोंडीपुरा भागामध्ये एक जण तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली यानुसार सापळा लावत आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एकाला नंग्या तलवारीसह जागीच पकडण्यात आले.त्याची चौकशी केली असता त्याचे नाव सरफराज हबीब आलम सय्यद वय 32 वर्ष राहणार बोबडे सर गल्ली धोंडीपुरा बीड असा त्याचा पत्ता असून,गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासणी चालू केली असून समाजकंटकावर नियंत्रण मिळवण्यासाठी गस्त सुरू ठेवण्यात आलेली आहे अशा गस्त दरम्यानच पोलिसांना माहिती मिळाली होती.सामान्य जणांना विनंती करण्यात येते की अशा प्रकारचे शस्त्र बाळगणारे किंवा समाजविघात कृत्य करणारे लोकांची माहिती आम्हा पोलिसांना 112 क्रमांकावर किंवा बीड शहर पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना माहिती द्यावी यांचे मोबाईल क्रमांक 7588807774 यावर देण्यात यावी. सदरील कार्यवाही बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोलडे,बीड शहर पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बबन राठोड पोलीस जमादार जयसिंग वायकर पोलीस अंमलदार शहेनशाह सय्यद, संदीप कांबळे यांनी केली.