माझ्या नादी लागू नका ! मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही.

आनंद वीर(प्रतिनिधी)मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे रविवारी परळी वैजनाथ येथे घोंगडी बैठकीच्या आयोजन हलगे गार्डन येथे करण्यात आलेहोत.शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढून भव्य रॅली काढण्यात आली.मराठा समाज बांधवांच्या वतीने जरांगे पाटील यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत मराठ्यांच्या नेत्यावर,मंत्र्यावर निशाणा साधत मराठ्यांचे आमदारच मराठ्याच्या मुळावर उठले आहेत.ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या रोखून धरण्याचे काम हे सरकार करत आहे. मराठ्याांनी मनावर घेतले तर आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्याला घराबाहेर पडू देणार नाही.असा इशारा दिला. त्यामुळे इथून पुढे त्यांना दारात उभे करू नका असे सांगितले.मला रात्री भेटायला येणाऱ्यांची तर आणखी नावेच सांगितली नाही *मागील अनेक दिवसांपासून माझ्या भेटीला अनेक नेते येत आहेत. रात्रीच्या भेटी घेणारे तर संख्या खूप मोठी आहे. त्यातही भाजपचे लोक जास्त आहेत. राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याने ते मला भेटायला येतात, म्हणून मला रात्रभर जागावे लागते. मला कुठल्याही राजकीय भूमिकेत अजिबात जायचे नाही. मी कोणत्याही नेत्यांच्या स्वतःहून वाट्याला गेलो नाही. मात्र जर माझ्या आणि समाजाच्या वाट्याला गेले तर मात्र त्यांची हायगय केली जाणार नाही. मी असल्यांना अजिबात सुट्टी देणार नाही हे परळीच्या पवित्र भूमीतून सांगतो असाही इशारा त्यांनी दिला.