जेवनाचे बिल मागितल्याने वेटरला कारने फरफटत नेत अपहरन!
तिघा विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल.

आनंद विर(प्रतीनिधी) माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील मेहकर पंढरपूर या पालखी महामार्गावर असलेले एका हॉटेलमध्ये सखाराम जनार्दन मुंडे व अन्य दोघेजण चार चाकी कार मधून जेवणासाठी आले होते.त्या तिघांनी पोटभर जेवण केल्यानंतर वेटर शेख साहील अनुसूद्दीन ला बिल मागितले.वेटर बिल घेऊन गेल्यावर त्यांनी बिल फोन पे करतो असे म्हणत स्कॅनर मागवले,नंतर वेटर सोबत कशाचे बिल,आम्हला बिल मागतो का असे म्हणत वाद घातला.वेटर कार जवळ गेला असता चालका शेजारी बसलेल्या एकाने वेटरला पकडून ठेवत एक किलोमीटर पर्यंत फरफटत नेले एवढेच नाही तर कार मधील तिघांनी भेटला रात्रभर मारहाण करत ओलीस ठेवले व त्याच्या खिशातील ११,५०० रुपये काढून घेतले.तसेच रात्रभर डोळ्याला पट्टी बांधून गाडीत ठेवले.त्याला सकाळी धारुर जवळ भाईजळी शिवारात सोडून देण्यात आले.या प्रकरणी शेख साहील अनुसूद्दीन या वेटरच्या फिर्यादीवरून सखाराम जनार्दन मुंडे रा.भाईजळी ता.धारुर व अन्य दोघांविरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड करत आहेत.