ताज्या घडामोडी
कब्रस्तान मधील अतिक्रमण करण्यात यावे म्हणून मुस्लिम बांधवांचे तहसील कार्यालय समोर उपोषण
कब्रस्तान मध्ये अतिक्रमण काढावे म्हणून निवेदन देऊन देखील तहसीलदाराची टाळाटाळ.

गेवराई तालुक्यातील मौजे तलवाडा येथील मुस्लिम कब्रस्तानात काही मुस्लिम बांधवांनी अतिक्रमण केलेले आहे. हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे म्हणून काही दिवसापूर्वी तहसील कार्यालयात निवेदन देऊन अतिक्रमण न काढल्यास तलवाडा येथील मुस्लिम बांधवांनी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु तहसीलदारांनी हे अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ केल्याने आज गेवराई तहसील कार्यालयासमोर तलवाडा येथील शेकडो महिला, मुले व मुस्लिम समाज बांधव गेवराई तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत अतिक्रमण काढण्याचा लेखी निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा निर्धार महिलांसह शेकडो मुस्लिम बांधवांनी केला.या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.