दरोडा,जबरी चोरी,घरफोडी गुन्ह्यातील आरोपी जेरबंद.
बीड स्थानिक गुन्हे शाखेची सिंघम कारवाई.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून बीड जिल्ह्यातील पोलीस ठाणे अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर कारवाई करण्याच्या व फरार आरोपीस जेरबंद करण्याच्या सूचना ठाणे प्रमुखांना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने बीड जिल्हयात विविध पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी व घरफोडी गुन्हे दाखल असलेला आरोपी गेल्या अनेक महिन्यापासून फरार होता.त्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी जेरबंद केले.बीड जिल्हायातील फरार आरोपी पकडण्याची मोहिम स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांनी सुरू केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना गुप्त माहितीच्या आधारे विविध गुन्ह्यात फरार असलेलां आरोपीची माहिती मिळाली असता यांनी आपल्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी यांना अभिलेखावरील गुन्ह्यात पाहिजे व फरार आरोपीची माहिती काढुन पकडण्यासाठी मार्गदर्शन केले.दिनांक 10/09/2024 रोजी पो.उप.निरीक्षक.श्रीराम खटावकर यांना घरफोडी गुन्ह्यात हवा आरोपी गोगल्या उर्फ बबल्या रघु चव्हाण रा.खोकरमोह याचा शोध घेत असतांना सदर आरोपी हा खोकरमोहा येथील बस स्थानक येथे असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यास शिताफिने पकडुन अभिलेखाची पाहणी करत पो.स्टे.बीड ग्रामीण गुरनं 303/2023 कलम 395 भादंवि मधील पाहिजे अभिलेखावरील असल्याची माहिती मिळाली तसेच त्याच्यावर इरत काही गुन्हे असल्याचे तपासला निष्पन्न झाले असता नमुद आरोपी हा पो.स्टे.माजलगाव ग्रामीण गुरनं 352/2018 कलम 457,380 भादंवि व माजलगाव ग्रामीण गुरनं 401/2018 कलम 394 भादंवि मध्ये पाहिजे असल्याचे निष्पन्नझाले.आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी पो.स्टे. बीड ग्रामीण येथे हजर करण्यात आले.ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुुुन्हे शाखा पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि..श्रीराम खटावकर,पो.ह.अशोक दुबाले, देविदास जमदाडे, सोमनाथ गायकवाड ,बाळु सानप,नारायण कोरडे,चालक दिपक लहाने सर्व स्था.गु.शा.बीड यांनी केली.