
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड मागील काही महिन्यापासून विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती, छोट्या छोट्या कारणावरून पिस्तूल काढून दाखवणे, फायरिंग करणे असे प्रकार घडले आहेत.मा. विशेष पोलीस महानिरीक्षक छ.संभाजीनगर परिक्षेत्र संभाजीनगर यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशदिले.त्याअनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक बीड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कारवाई करण्याचे आदेश देवून मार्गदर्शन केले आहे.पोलीस निरीक्षक उस्मान शेख,स्था.गु.शा.बीड यांनी वरिष्ठांचे आदेशान्वये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यावरुन दिनांक10/09/2024रोजी परळी शहरातील संभाजीनगर भागात स्था.गु.शा.पथक गस्त घालत असतांना पोलीस हवालदार विष्णु सानप यांना गुप्त बातमी मिळाली की, इसम नामे अजय उर्फ लोमटया गौतम साळवे रा.फुलेनगर परळी हा उडडाणपुलाखाली शिंदीखाना येथे गावठी कट्टा घेवुन फिरत आहे.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन सदरची माहिती पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना कळवुन त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरुन पोह/विष्णु सानप यांनी स्था.गु.शा. पथकासह बातमी ठिकाणी पाचारण होवून बातमी ठिकाणी सापळा लावला असता एक इसम संशयीत इसम मिळुन आला त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याचे नाव अजय उर्फ लोमटया गौतम साळवे वय 24 वर्षे रा.फुलेनगर परळी ता.परळी जि.बीड असे सांगितले व त्यांचे अंगझडती घेतली असता त्यांचे उजव्या बाजुला एक गावठी पिस्टल मॅग्झीन सह मिळुन आली असुन त्यामध्ये दोन जिवंत काडतुस असा एकुण 42,000/- मुदेमाल मिळुन आला असुन त्याचे विरुध्द पो.स्टे. संभाजीनगर येथे आर्म अॅक्ट प्रमाणे पो.ह.विष्णु सानप यांचे फिर्याद वरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कामगिरी अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक बीड,सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, बीड, पो.नि.उस्मान शेख स्था.गु.शा. बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोह/विष्णु सानप, मारुती कांबळे, विकास राठोड, बाळकृष्ण जायभाये, सचिन आंधळे, चालक पोह/नितीन वडमारे यांनी केली आहे.