बीड जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकाची दादागिरी पहा!
"सी.एस.अशोक बडे,मरिज लाईन मे खडे"सध्या जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती

बीड जिल्हा रुग्णालय सेक्युरिटी गार्डची दादागिरी वाढली,सी.एस बडे यांनी गाडीची हवा सोडण्याची परवानगी दिली का?
आनंद वीर(प्रतिनिधी) जिल्हा रुग्णालयातील सिक्युरिटी गार्ड करून येणाऱ्या रुग्ण,रुग्णांचे नातेवाईकां सोबत दादागिरीच्या भाषेत संभाषण करून चक्क गाडीची हवा सोडून देण्यात येत आहेत मात्र याकडे जिल्हा शल्य चिकित्सक यांचा कानाडोळा का करतात? असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्हा रुग्णालयातील सिक्युरिटी गार्डची(सुरक्षा रक्षकाची) दादागिरी वाढली असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही.कारण जिल्हा रुग्णालयातील येणारा प्रत्येक माणूस हौसेने नाही तर मजबुरीने येत असतो,त्यांना अरेरावी करत चक्क त्याच्या गाडीची हवा सोडून देणे हे कितपत योग्य ?असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकाला पडला आहे. जिल्हा रुग्णालयातील दररोज शेकडो रुग्ण आजूबाजूच्या खेड्यापाड्यावरून उपचारासाठी येत असतात त्यांना जिल्हा रुग्णालयाचा कसलाच ज्ञान नसतो आणि त्यांना अशा सेक्युरिटी गार्ड करून अरेरावीच्या भाषेत बोलणे ,गाड्यांची हवा सोडणे जर आपल्या ओळखीचा आला तर त्याची हुजरेगिरी करणे हे कितपत योग्य? असा प्रश्न उपस्थित होत आहे.यांना डॉक्टर अशोक बडे यांनी असं वागण्याची परवानगी दिली आहे का? जर दिली असेल तर ती लेखी स्वरूपात आहे का? नसेल तर या सिक्युरिटी गार्डला कोणाचा पाठबळ आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सी. एस.बडे यांनी बडे अश्या मग्रूर सुरक्षा रक्षकाला आवर घालावा अशी मागणी रुंग्न व रुग्णाला भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.