
कोकणामध्ये गणपती आगमन ते विसर्जन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, त्यामुळे बीड बस स्थानकातील बस गाड्या कोकणात पाठवल्या असल्याने बीड बस स्थानकातून प्रवास करण्याकरिता बस अपुऱ्या पडत असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असून बसची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहने आवाची संवाद दर आकारत असल्याने याचा भुर्दंड प्रवाशाच्या खिशाला पडत आहे.आगार निहाय दिलेल्या जिल्ह्यातील बस अंबाजोगाई – ४३,बीड -४०,परळी -३२,पाटोदा- २६,आष्टी -२६,माजलगाव -२६,धारूर -२६,गेवराई -२६ आगारातील निम्म्या बस कोकणात चाकर माण्या साथी पाठवल्या असल्याने बीड बस स्थानकातून गावी जाणार येणाऱ्या प्रवचन मात्र नाहक त्रास सहन करावा लागत असून,त्यांचे हाल होत आहेत.