डॉक्टरच्या निष्काळजी पणामुळे महिलेचा मृत्यू,मृतदेह सी.ए.बडे च्या केबिनमध्ये ठेवला.
शल्य चिकित्सक बडे सह डॉक्टर नर्स,वार्ड बॉय जबाबदार

आनंद वीर( प्रतिनिधी) बीड शहरातील विष घेतलेल्या एका महिलेस बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्या महिलेचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचां आरोप नातेवाईकानी करत मृतदेह थेट बीड जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बडे यांच्या केबिनमध्ये ठेवण्यात आला.आज दिनाक ११ सप्टेंबर रोजी सकाळी उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्याने त्यांना त्रास होऊ लागल्याने आज सकाळी उपचारासाठी बीड शासकीय रुग्णालयात कुटुंबातील लोकांनी दाखल करण्यात आले होते.रेखा विपुल गायकवाड वय 34 वर्ष रा. काळा हनुमान ठाणा चांदणे वस्ती बीड महिलेचा डॉक्टरचे निष्काजीपणने मृत्यू झाल्याने वेळी शेकडो नातेवाईक व कार्यकर्ते बडे यांच्या केबिनमध्ये ठाण मांडून बसले होते. या घटनेतील संबंधित सर्व दोशीवर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा तसेच कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी यावेळी केली.तसेच संबंधित डॉक्टर वर सुदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे लेखी आश्वासन दिल्याशिवाय सी एस बडे यांच्या केबल मध्ये नातेवाईक व कार्यकर्ते ठाण माणूस बसले होते.