बुलेट चा आवाज वाहतूक पोलिसांनी केला बंद.
बुलेट राजा शाळा,महाविद्यालया समोर मारतात शायनिंग !

वाहतूक शाखा पोलिसांनी ठो ठो आवाज करणाऱ्या सायलेन्सर जप्तीची कारवाई पुन्हा सुरू करून दिनाक.१२ गुरुवारी झालेल्या कारवाईत 29 सायलेन्सर केले जप्त
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरामध्ये विना नंबरच्या गाड्या आणि ठोठो आवाज करणारे दुचाकीचे सायलेन्सर लोकांना त्रासदायक ठरू लागल्याने जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने स.पो.नि.सुभाष सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी बीड शहरात कारवाई करून तीन तासांमध्ये 29 सायलेन्सर जप्त केले.ही कारवाई सकाळी 10 ते दुपारी 1वाजेपर्यंत करण्यात आली.या सायलेन्सरची वाहतुक शाखेतर्फे विल्हेवाट लावण्यात येणार आहे .बीड शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या ठोठो आवाज करणारे सायलेन्सर आणि विना नंबरच्या गाड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या गाड्या जप्त करण्याची कारवाई जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारी करण्यात आली.यापूर्वीही बीड शहरात सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती .मात्र बुलेट राजाल एवढ्यावर काहीच फरक पडला नसल्याने. पुन्हा एकदा ही कारवाई वाहतूक शाखेकडून सुरू करण्यात आली. गुरुवारी झालेल्या या कारवाईमध्ये बीड शहरांमध्ये 29 सायलेन्सर जप्त करण्यातआले. याबरोबरच बिना नंबरच्या गाड्या दंड अकारुन सोडण्यात आल्या गेल्या काही दिवसापासून बुलेट राजा शाळा,महाविद्यालय कोचिंग क्लासेस व सायंकाळच्या वेळी ठोठो आवाज करणाऱ्या टारगट मुलांच्या गाड्यांचा त्रास वाढू लागला. अनेक तक्रारी वाहतूक शाखेकडे गेल्यानंतर वाहतूक शाखेने गुरुवारी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली. आता ही कारवाई सतत चालू राहणार असून गुरुवारी 29 सायलेन्सर जप्त करण्यात आले हे सायलेन्सर नष्ट करण्यात येणार आहेत.ही कारवाई वाहतूक शाखेचे स.पो.नि. सुभाष सानप यांच्यासह पोलीस हवालदार नारायण दराडे, शिवदास घोलप ,हंगे पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस होमगार्ड निलेश चव्हाण आदींनी सहभाग घेतला.ही कारवाई यापुढेही चालूच राहणार असल्याचे बीड वाहतूक शाखेचे स.पो.नि.सुभाष सानप यांनी सांगितले.