ताज्या घडामोडी

गेवराईचे आमदार 100% बदलणार ?

माझ्या कुटुंबातील कोणीही आमदारकीची निवडणूक लढवणार नाही आ.लक्ष्मण पवार.

आनंद वीर (प्रतिनिधीविधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच महायुतीतील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेवराई भाजपाचे आ.लक्ष्मण पवार यांनी थेट पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करीत आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.आ. लक्ष्मण पवार यांनी पालकमंत्र्यांवर आरोप करताना म्हटले की एक चांगला तहसीलदार, एक चांगला बीडीओ,एक चांगला पोलीस अधिकारी गेवराईला द्या, एवढंच मागीतलं होतं. पण तेही मिळालं नाही.पालकमंत्री ऐकत नसल्याचे खंयावेळी बोलून दाखवली त्यामुळे राजकारण तरी कशाला करायचं?असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. त्यांनी आपल्या मनातील खदखद अशाप्रकारे बाहेर काढल्याने महायुतीच्या घटकपक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.आ. लक्ष्मण पवार म्हणाले, सध्याच्या राजकारणाची मला किळस येत आहे. मागच्या दहा वर्षापुर्वी जे राजकारण होते ते आता राहीलेले नाही. ज्या दिशेने राजकारण जात आहे ते मनाला पटत नाही. नैतिकतेला बरे वाटत नाही. त्यामुळे आपणच बाजुला झालेले बरे. म्हणून मी हळूहळू मनाला न पटणाऱ्या गोष्टीतून बाजुला जात आहे. वरचे बळ देणारे असतील तर गतीने काम करता येते. पण आता तशी परिस्थिती राहीली आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला. मला पक्षाने अजून उमेदवारी संदर्भात विचारलेले नाही. पक्षाने विचारणा केली तर मी माझे म्हणणे पक्षश्रेष्टींसमोर मांडेल. जनतेला न्याय देवू शकत नसेल तर आपण पदावर राहू नये, असे माझे प्रामाणिक मत आहे. एखादी परिक्षा देताना अभ्यास करावा लागतो. आणि मग पेपर द्यावा लागतो. अभ्यास करायला वेळच न देता परिक्षा द्या म्हणणे चुकीचे नाही का? विचारणा झाली तर पक्षासमोर या गोष्टी मी सहज बोलणाऱ्यांपैकी आहे, असेही पवार म्हणाले. मी दलबदलू नाही, मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली त्या पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांपैकी मी नाही असे आ.लक्ष्मण पवार म्हणाले, सध्याच्या राजकारणाची मला किळस येत आहे. मागच्या दहा वर्षापुर्वी जे राजकारण होते ते आता राहीलेले नाही.ज्या दिशेने राजकारण जात आहे ते मनाला पटत नाही. नैतिकतेला बरे वाटत नाही. त्यामुळे आपणच बाजुला झालेले बरे. म्हणून मी हळूहळू मनाला पटणाऱ्या गोष्टीतून बाजुला जात आहे. वरचे बळ देणारे असतील तर गतीने काम करता येते. पण आता तशी परिस्थिती राहीली आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला. मला पक्षाने अजून उमेदवारी संदर्भात विचारलेले नाही. पक्षाने विचारणा केली तर मी माझे म्हणणे पक्ष श्रेष्टींसमोर मांडेल. जनतेला न्याय देवू शकत नसेल तर आपण पदावर राहू नये, असे माझे प्रामाणिक मत आहे. एखादी परिक्षा देताना अभ्यास करावा लागतो. आणि मग पेपर द्यावा लागतो. अभ्यास करायला वेळच देता परिक्षा द्या म्हणणे चुकीचे नाही का? विचारणा झाली तर पक्षासमोर या  गोष्टी मी सहज बोलणाऱ्यांपैकी आहे, असेही पवार म्हणाले. मी दलबदलू नाही, मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही.परंतु माझ्या कुटुंबातील कोणीही आमदारकीचे निवडणूक लढणार नसल्याचे यावेळी आमदार लक्ष्मण पवार यांनी बोलून दाखवले. त्यामुळे गेवराईचा यावेळचा आमदार शंभर टक्के बदलणार असे जनतेतून बोलले जात आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button