महिलेच्या मृत्यूस कारणीभूत दोन डॉ.तडकाफडकी निलंबित
मृत महिलेच्या नातेवाईकांनी प्रेत सी.एस.बडे च्या केबिनमध्ये ठेवले होते

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड शहरातील पेड बीड भागातील रेखा विपुल गायकवाड या महिलेने उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्याने त्यांना त्रास होऊ लागल्याने बीड शासकीय रुग्णालयात दिनाक ११ सप्टेंबर रोजी सकाळीउपचार साठी दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाला असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला व उच्चार दरम्यान काळजीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टरांना निलंबित करावे म्हणून प्रेत सी एस बडे यांच्या कॅबिअरमध्ये ठेवण्यात आले होते, त्यामुळे काही काळ बीड जिल्हा रुग्णालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.डी.पी.आय.चे अध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे यांनी डॉक्टरांना निलंबित करण्याबाबत लेखी आश्वासन वरिष्ठ डॉक्टरांकडून घेण्यात आले. आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी जिल्हा रुगयातील डॉक्टर अशोक साहेबराव भोपळे व सागर सूर्यकांत चौरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच दोन दिवसाच्या आत निलंबनाची ही पहिलीच कारवाई आहे.