ताज्या घडामोडी

राहुल गांधीच्या फोटोला शिवसेने कडून जोडे मारो आंदोलन

आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याने बीड शिवसेना आक्रमक

*आरक्षणाचा विरोध करणाऱ्या राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी- जगताप, मुळूक*

आनंद वीर(प्रतिनीधी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन भैय्या मुळूक यांच्या नेतृत्वाखाली बीड शिवसेनेच्या वतीने आज दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.00 वाजताच्या दरम्यान बीड शहरातील जालना रोड येथे असलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर राहुल गांधींविरुद्ध जोडे मारो आंदोलन केले. भारतीय संविधानाचा अपमान करणारे राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी माफी मांगो, काँग्रेस मुर्दाबाद, असे नारे देऊन शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन भैय्या मुळूक यांच्यासह शिवसेनेच्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारले.

लोकसभा निवडणुकीआधी जातनिहाय जनगणना, आदिवासी, दलित जनतेबद्दल कळवळा दाखविणाऱ्या काँग्रेसची सामाजिक न्यायासंदर्भातली भूमिका किती दुटप्पी आहे, हे राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने कायम लोकशाही व संविधानाची पायमल्ली केली असून आता काँग्रेसची मजल आरक्षण रद्द करण्याची इच्छा व्यक्त करण्यापर्यंत गेली आहे. वारंवार विदेशात जाऊन भारताची बदनामी करण्याचे काम हे राहुल गांधी करत आहे. शिवसेना नेहमीच आरक्षणाचा सन्मान करत आली आहे, संविधानाचा सन्मान करत आली आहे. भारताची राज्यघटना बदलण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. त्यामुळेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत याबद्दल आपले खरे रूप दाखवत आहेत. अमेरीकेत जाऊन आरक्षण रद्द करू असे अपमानजनक विधान राहून गांधी यांनी केले. ही भारताला शर्मनाक करणारी बाब आहे. ही बाब भारताचे नागरिक व  शिवसेना कदापि सहन करणार नाहीत. त्यामुळे गांधींनी भारताची माफी मागावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन भैय्या मुळूक यांनी केली आहे.  याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी, युवासेना, पदाधिकारी-लोकप्रतिनिधी तथा शिवसैनिकांची उपस्थिती होती.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button