
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये मल्टीस्टेट, पतसंस्था अचानक बंद झाल्याने हजारो ठेवीदार अडचणीत आले असून मल्टीस्टेटचे अध्यक्ष मात्र मजा करत फिरत होते.बीड शहरातील शाहीनाथ परभने यांनी “साईराम मल्टीस्टेट”या नावाने मल्टीस्टेट होती.त्यांनी आपले जाळे वाढवत 16 शाखा साईराम नावाने केल्या होत्या.जास्त पैशाची आम्हीच दाखवल्याने त्यामध्ये गोरगरीब लोकांनी ठेवी ठेवल्या होत्या.ठेवीदार चे पैसे वेळेवर न मिळाल्याने साईराम परभने यांच्यावर कोट्यावधी रुपयाच्या फसवणूक प्रकरनी विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीची सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे साईनाथ परभणे हे फरार झाले होते. गेल्या अनेक महिन्यापासून ते पोलिसांना गुंगारा देत, सिम कार्ड बदलून ऐश आरामात फिरत होते. बीड आर्थिक गुन्हे शाखेला मिळालेले माहितीनुसार साईराम परभने हे पुणे येथील सासवड येथे असल्याची माहिती मिळाली असता फरार असलेले शाहीनाथ परभने, विनायक परभने, कुणाल परभने यांना पुण्यातून ताव्यात करण्यात आली.बीड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस.एस. शेजाळं, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार, पोलीस आमदार रामनाथ तांदळे, संजय पवार, भाऊसाहेब चव्हाण, चालक दुधाळ यांनी परभने यांच्या पूर्ण खानदानाला ताब्यात घेतले.