MPDA मधील फरार आरोपी शिवाजीनगर पोलीसांनी केला जेरबंद
शिवाजीनगर पोलिसाची दमदार कामगिरी.

आनंद वीर(प्रतिनिधी)MPDA मधील फरार आरोपी शिवाजीनगर पोलीसांनी पाथर्डीतून ताब्यात घेतले.फेब्रुवारी 2024 पासुन MPDA मध्ये स्थानबध्दचे आदेश झालेला निखील गणेश रांजवण वय २० वर्षे, रा.फिनीक्स हॉस्पीटल च्या पाठीमागे, जालना रोड, शाहु नगर, बीड माघील आठ महिण्यापासुन वेळोवेळी वेगवेगळया ठिकाणी शोध घेतला असता मिळुन येत नव्हता. सदरचा प्रस्तावीत स्थानबध्द इसम हा सध्या मढी ता.पाथर्डी जि.अ.नगर येथे असल्याचे गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे MPDA मधील स्थानबध्द इसम नामे निखील गणेश रांजवण वय २० वर्षे याचा शोध घेण्यासाठी स. फौ. ब.न.११७८ संजय वडमारे, पोलीस हवालदार १६६४ रविंद्र आघाव, पोकॉ. ९०४ लिंबाजी महानोर यांचे पथक पाठविण्यात आले.या पथकाने मढी येथे आरोपीचा बारकाईन व कसोशीने शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले आहे.मागील वर्षी मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झाली होती त्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता, बऱ्याच वेळा प्रयत्न करून देखील तो पोलिसाच्या हाती लागत नव्हता पण आज त्याला अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथून अटक करण्यात आली व यास छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृह येथे रवानगी करण्यात आली.ही कारवाई बीड पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंबर गोल्डे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, स.पो.नि.विलास मोरे, स.फौ. संजय वडमारे, पोलीस हवालदार रविंद्र आघाव, पो.ह. परजणे, पो.कॉ. लिंबाजी महानोर, पो.शि. कांदे यांनी केली.