साईनाथ परभणेला 11 दिवसाची पोलीस कोठडी
सर्वच मल्टीस्टेट वाल्यांच्या प्रॉपर्टीचां लिलाव करून,गोरगरीब ठेवीदारांचे पैसे देण्यात यावे

बीड आनंद वीर (प्रतिनिधी):- मागील काही महिन्यांमध्ये बीड येथील मल्टी स्टेट पतसंस्था यांनी ज्यादा पैशाची आम्हीच दाखवत ठेवीदारांना करोडो रुपयांचा गंडा घालत मल्टीस्टेट चे अध्यक्ष संचालक मंडळ फरार झाले होते.गेल्या अनेक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या ठिकाणी सिम कार्ड बदलून वास्तव्य करणाऱ्या साईराम मल्टीस्टेटचा अध्यक्ष साईनाथ परभणेला बीड आर्थिक गुन्हेेशाखा पोलिसांनी पुण्यातून अटक केले. त्याच्या सोबत मुलालाही अटक करण्यात आले होते.गोरगरीब जनतेचे पैसे साईराम मल्टीस्टेटया पतसंस्थेत अडकलेले आहेत. ठेवीदाराचे पैसे वेळेवर परत न मिळाल्याने ठेवीदाराने साईनाथ परभणी सह संचालक मंडळावर बीड सह इतर जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. बीड पोलिसांनी पुण्यातून साईनाथ परभणे सह विनायक परभणे व कुणाल परभणेना अटक केले.कोट्यावधी रूपयांचा चिठ्ठी हवाला मध्ये साईराम परभणेचा हात असल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये जोर धरू लागली आहे.आज दिनाक 16 सप्टेंबर सोमवार रोजी साईनाथ परभने, विनायक परभने,कुणाल परभने ला बीड न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायाधीशाने पुढील चौकशीसाठी 11 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.