गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार तुतारी फुंकणार.?
दोन्हीही पंडितांच्या घरातील सदस्य आमदार म्हणून निवडून द्यायचा नाही.पवार

आनंद वीर(प्रतिनिधी)गेल्या काही दिवसापासून गेवराई चे आमदार लक्ष्मण पवार हे भाजप मध्ये नाराज असल्याची चर्चा होती,ते भाजप पासून अलिप्त होते,त्यांनी बीड पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर उघडपणे नाराजी बोलून दाखवली.आमदार लक्ष्मण पवार यांनी भावनिक होत मी व माझ्या कुटुंबातील कोणीही आमदारकीची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट सांगितल्याने कार्यकर्त्यांना धक्का बसला,गेवराईच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.त्यामुळे गेवराई मध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली होती.सत्तांतर झाल्यापासून आमदार पवार यांनी पक्ष नेतृत्वाला,पालक मंत्र्याला लक्ष घालण्याची मागणी केली,एक चांगला तहसीलदार,एक चांगला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी द्यावा अशी मागणी केली होती.परंतु अनेक महिने झाले याकडे कोणीही लक्ष दिले नाही. आमदारांनी स्वतःभ्रष्ट गुत्तेदार,अधिकाऱ्यांना पालकमंत्री पाठीशी घालत आहेत, पालकमंत्री व गुत्तेदार यांच्यामध्ये सेटलमेंट असल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली.त्यामुळे काही दिवसापूर्वी राजकारणातून दूर जाणार असल्याची माहिती दिली होती परंतु,अशी जर पंडितांची चांदी होणार असेल तर विचार करु,निवडणूक लढविली नाही तरी पंडीतांना निवडून येऊ देणार नाही.असेही आमदार लक्ष्मण पवार यांनी म्हटले आहे.यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी भाजपाचे फलक काढून टाकली,तसेच भाजपा पक्षश्रेष्ठी ऐकत नसेल तर “तुतारी हाती घ्या म्हणत “आज सकाळपासून हजारो कार्यकर्त्यांनी आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता.पालकमंत्री धनंजय मुंडेंनी आमदार लक्ष्मण पवारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला.पंडितांना वाटोळे केले आहे.मात्र,त्यांच्या घरातला माणूस निवडून येऊ नये,असे देखील उपस्थितांना सांगितले.आ. लक्ष्मण पवार शरद पवार गटात प्रवेश करणार का? तुतारी घेणार का?याकडे बीड सह राज्याचे लक्ष लागले आहे.