ताज्या घडामोडी

चार दिवसात निर्णय घ्या अन्यथा,राजकीय करियर उद्ध्वस्त करेन:जरांगे पाटील

"सरकारमध्ये सरपंचाला काही किंमत नाही,उपसरपंच खरा मालक"

आनंद वीर(प्रतिनिधी)मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा उपोषणाला सुरुवात केली असून आक्रमक पवित्रा घेतला आहे.सरकारने मनोज जरांगे पाटील यांना सहकार्य करण्याचं आव्हान केलं आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला धारेवर धरले आहे.आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यधा नाही तर”सर्वांचं राजकीय करियर उद्धस्त करणार,असा इशारा देत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.भारतात अशी जात नसेल ज्यांनी वर्षभर सरकारला सहकार्य केलं, पण ती मराठा जात आहे जिने सहकार्य केलं आहे. आम्हालाही काहीतरी मर्यादा आहेत,आमच्यावर समाजाची काही जबाबदारी आहे.आम्ही वर्षभर तुम्हाला मदत आणि सहकार्य करतच आहोत तरीसुद्धा तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल तर कोणते सरकार तुम्ही चालवता आणि कशाला चालवतात? असा संतप्त सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे.आम्ही आणखी किती दिवस सरकारला सहकार्य करायचं? फडणवीसांचं ऐकून काय मराठा समाज संपवून टाकायचाआहे का? अशा प्रश्न जरांगे पाटील यांनी सरकारला केला आहे.फडणवीस साहेब मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा.सध्या मी राजकीय बोलणार नाही मात्र नंतर सगळ्यांचाच हिशोब करतो,असं आव्हानच जरागे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे.”सरपंचाच्या हातात काही नाही,उपसरपंचच सर्व कामे पाहतात.”अशी खोचक टीकाही जरागे यांनी केली आहे. गेल्या चार दिवसांत आमचा विषय संपवा आणि सगेसोयरेची तात्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा २०२४ला आमच्या नावानं ओरडत बसायचं नाही. मग फडणवीसांनी कितीही गणित करू द्या,मी त्यांची सगळी गणितं फेलकरणार,असा एल्गारच जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचामुद्दा तापण्याची शक्यता आहे.दोन-तीन दिवसांत आरक्षण विषयी मागण्या करा,अन्यथा सर्वांचे राजकीय करियर उध्वस्त करेल असा पाटील यांनी सरकारला इशारा देत उपोषणावर ठाम आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button