बनावट नोटा प्रकरणी संशयित आरोपीच्या घरी आढळले घातक शस्त्र !
बीड पोलिसांनी संशयित आरोपीच्या घरी धाड टाकून केली घातक शस्त्रे जप्त.

आनंद वीर (प्रतिनिधी)बीड शहरा मधील कागदवेस भागात बनावट पाचशे रुपयांच्या नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना बीड शहर पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्याकडून पाचशेच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.आकाश जाधव व एक अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेऊन काल बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना अधिक चौकशीसाठी सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. आकाश जाधव हा बीकॉम द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता तसेच धांडे नगर परिसरामध्ये फोटो स्टुडिओ व्यवसाय करत होता, प्रदुखाही महिन्यापासून तू त्याने फोटो स्टुडिओ बंद केला होता.त्यामुळे तो या बनावट नोटा मध्ये कसा अडकला? त्याला बनावट नोटा चलनासाठी कोणी दिल्या? यामागे मुख्य सूत्रधार कोण?हा सर्वांनाच प्रश्न पडला होता, त्याची बीड शहर पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोन नावे समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. त्याआधारे आज दिनाक १९ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी १ वाजता बीड पोलिसांनी चौकशीत नावे समोर आलेल्या संशयित आरोपीच्या घरी अचानक धाड टाकून झाडझडती घेतली असता घरामध्ये तलवार, कुकरी ,खंजर सारखे घातक शस्त्र आढळून आली, ती शस्त्र बीड शहर पोलिसांनी जप्त करून पुढील कारवाई सुरू आहे. बनावट नोटा प्रकरणी मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली आहे.परंतु या बनावट नोट प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? हे शोधण्याचे पोलिसापुढे आव्हान आहे.ही कारवाई अविनाश बारगड बीड पोलीस अधीक्षक, सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक, विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ, शिवाजी बंटेवाड पोलीस ठाणे बीड ग्रामीण, अशोक मोदीराज पोलीस निरीक्षक पेठ बीड सह पथकाने कारवाई केली.