
आनंद वीर(प्रतिनिधी) गेवराई आगार डेपो बस क्रमांक MH 20 BN 3573 अंबड कडे प्रवाशी घेऊन जात असताना रस्त्यातच मोसंबी घेऊन येणारा ट्रकने बस ला समोरासमोर जोराची धडक दिल्याने बस चां वाहक बंडू बारगजे सह पाच ते सहा प्रवाशी जागीच ठार झाले.बंडू बारगजे हे बस आगारातील एका संघटनेचे अध्यक्ष होते.हा गेवराई अंबड दरम्यान शहापुर (वडोगिद्री)गावाजवळ सह ते सात प्रवासी जागीच ठार झाले असून, या भीषण अपघातात महिला देखील मृत झाली आहे.इतर प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की जखमी झालेल्यांना उपचार करण्यात देखील वेळ मिळाला नाही.स्थानिक नागरिकांनी जखमीना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून मृताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांब लांब रांगा लागल्या होत्या.