“ज्ञानराधा”मधील ठेवीदाराचे पैसे मिळणार का?
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेवर"लिक्विडेटर"नेमण्यात आले

आनंद वीर(प्रतिनिधी)ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेत गोरगरीब, शेतकरी,व्यापारी, डॉक्टर.यांचे पैसे ठेवी अडकल्याने ठेवीदारांना अनेक अडचीनाचा सामना करावा लागत आहे.या बाबद केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश देले आहेत.बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडवून हाँगकॉंगला पळवल्याचा ठपका असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर केंद सरकारनं महत्वाच्या सूचना केल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारींची गंभीर दखल करत घेत या पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्र सरकरने दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन हे निर्देश दिले आहेत. सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला 15 दिवसांच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत येणार आहेत.गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून ज्ञानराधाचे सर्वेसर्वा सुरेश कुटे सध्या कोठडीत असून अर्चना कुटे मात्र फरार आहेत. दरम्यान याच प्रकरणी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे बैठक घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिक्विडेटर नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत.
*लिक्विडेटर म्हणजे काय?*-ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्यात आला आहे. याचा गुंतवणूकदारांना तसेच फसवणूक झालेल्या ठेवीदारांना याने दिलासा मिळणार आहे. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे खासगी मालमत्ता एकत्र करून त्याचे मुल्यांकन केले जाईल व त्यानंतर ठेवीदारांना यातून आलेली रक्कम समान देण्यात येते. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख 70 हजार ठेवीदार, खातेदारांचे 3700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. या प्रकरणात या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जातंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी 50 शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत.सुरेश कुटे यांच्या कम्पणी,मालमत्तावर पाच पट विविध बँकेचे कर्ज असल्याने त्या बँका प्रथम दावा करतील.मग ठेविदाराचां विचार केला जाईल.केंद्र सरकारने ज्ञानराधा मल्टीस्टेटवर लिक्विडेटर नेमल्याने ठेवीदाराचे पैसे परत मिळतील का? असा प्रश्न ठेवीदाराना पडला आहे.