
आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे,तसेच आपल्या मराठा समाजासाठी विविध मागण्या मान्य कराव्यात म्हणून अंतरवाली सराठी येथे सहाव्यांदा उपोषणास बसले आहेत.त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची तब्येत खालावत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “सगेसोयरे” बाबद दिलेला शब्द त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे त्यात कुठलीही अट नसावी यासह अन्य मागण्यासाठी जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत.त्यांनच्या उपोषणाला पाठिंबा, समर्थन म्हणून आज सकल मराठा समाजाकडून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्यामुळे आज सकाळपासूनच व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक,हॉटेल, सुभाष रोड, माळवेस,कारंजा रोड,बाजारपेठ बंद ठेवून जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दिला.सकल मराठा समाजाकडून बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात आला.