डॉक्टर उपचार करत नसल्याने जिल्हा रुग्णालयात म.न.से.स्टाईल राडा
सी.एस.यांनी कर्तव्यात कुसूर केलेल्या डॉक्टरांवर कारवाई करावी

गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचार न केलेल्या डॉक्टरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यायला.करण लोंढे म.न.से. शहराध्यक्ष
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या अनंत अडचणीच्या सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे.जिल्हा रुग्णालय चिकित्सक म्हणून” बडे” यांनी जिल्हा रुग्णालयाचा पदभार घेतल्यापासून बीड जिल्हा रुग्णालयातील कारभार ढासळल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना डॉक्टर नर्स हे दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.गेल्या आठवड्यात विष प्राशन केलेल्या महिला उपचारासाठी दाखल केले असता कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी हलगर्जी बना केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रात्री बार्शी रोडवर आम्हाला समोर दुचाकीला अज्ञात वाहणाने धडक दिल्याने दुसरी स्वार गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी त्याला उपचारासाठी बीड येथ शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, परंतु कर्तव्यावर असलेले डॉक्टरांनी उपचार न करता त्याला खाजगी दवाखान्यात घेऊन जा असा सल्ला दिल्याने मनसेचे शहराध्यक्ष करण लोंढे यांनी डॉक्टरला तरुणाला तात्काळ उपचार करावा अशी विनंती केली असतां डॉक्टरांनी त्यांना खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याने करण लोंढे यांनी संतापून मनसे स्टाईलने उत्तर देत, अपघात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. कर्तव्यात कुसुरकर डॉक्टर और कारवाई झाली नाही तर मनसे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून,उपोषणास बसणार असल्याची माहिती करण लोंढे यांनी दिली आहे. यावेळी मनसेचे करण लोंढे, जिल्हा सचिव सोमेश कदम, तालुका सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी हे तरुणावर उपचार न केल्याने आक्रमक होवून मनसे स्टाईल राडा केला.