गोदापत्रात स्थानिक गुन्हे शाखेची छापेमारी 15 लाखाचा मुद्देमाल जप्त.
छापेमारी करत वाळू, ट्रॅक्टर,केनी जप्त.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड पोलीस अधीक्षक पदी अविनाश बारगळे यांनी पदभार घेतल्यापासून अवैद्य धंदे करणाऱ्या,गुंड व्यक्ती, फरार आरोपीस कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने दिनांक 21/09 /2024 रोजी पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांना गुप्त बातमी मिळाली की, संगम जळगाव-हिंगणगाव येथील गोदा नदी पात्रात वाळू ट्रॅक्टर व केनीच्या सहायाने चोरटी उपसा चालु आहे. त्यावरुन श्री. उस्मान शेख साहेब यांनी स्था.गु.शा.बीड चे पो.उप.नि. सिध्देश्वर मुरकूटे व पथकाला छापा मारण्याचे सुचना दिल्या. त्यावरुन पो.उप.नि.सिध्देश्वर मुरकूटे व त्यांचे सोबत गेलेल्या पथकाने स़ंगमजळगाव -हिंगणगाव येथे शेतकर्याच्या वेषभुषेत पेहराव करुन गेले असता तेथे नदी पात्रात ट्रॅक्टर व केनीच्या सहाय्याने वाळु चोरटी उपसा चालु असल्याचे दिसले. स्थागुशा पथकाने लागलीच पाठलाग करुन छापा टाकला असता छाप्यामध्ये 03 ट्रॅक्टर व केनी ताब्यात घेतल्या व ट्रॅक्टर चालक व मालक यांचेवर गेवराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. व तीन आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला हजर केले आहे.सदर कारवाईमध्ये एकुण 15 लाखचा मुद्येमाल तपासकामी जप्त केला आहे.सदरची कामगिरी मा.श्री. अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड, पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे, सफौ/जगताप पोह/ कैलास ठोंबरे , पोना/विकास वाघमारे, पोशि/सुनील राठोड यांनी केली आहे.