विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू.
करण कोरडे च्या आकस्मित मृत्यूने नातेवाईक,मित्रपरिवारात हळूहळू व्यक्त.

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरात राहणाऱ्या करण कोरडे या तरुणाला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. शुक्रवारी (दि.२०) रात्री ९ च्या सुमारास मत्य झाल्याची घटना घडली आहे.करण कैलास कोरडे वय- १९ वर्ष रा.नाळवंडी नाका,बीड.असे मृत तरुणाचे नाव आहे.सविस्तर वृत्त असे कि, करण कोरडे हा तरुण लाईट फिटिंगचे काम करत होता, शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिह्यातील तेरखेडा या गावी लाईट फिटिंगच्या कामासाठी गावातील एका ग्रामस्थाच्या फिटिंग चे काम करत असताना त्याला अचानक विजेचा शॉक लागल्याने त्याला तात्काळ धाराशिवच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. करन कोरडे हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता,त्याला दोन बहिणी असून करण चें वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तो महाविद्यालयीन शिक्षण करत वडिलांना हातभार लागावा म्हणून लाईट फिटिंग चे काम करत होता,खूप मेहनती व अत्यंत मनमिळाऊ स्वभाव अशी त्याची पेठ बीड, नाळवंडी नाका भागात ओळखं होती.त्याच्या आकस्मित मृत्यू झाल्याने आई वडील,नातेवाईक व मित्रपरिवारवर दुःखाचा डोंगर कोसळला.शनिवारी दुपारी मोंढा रोडवर असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत करणवर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.