केज मध्ये भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न,एकास नागरिकांनी पकडले
दिवसा अपहरण झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून चोरट्याने धुमाकूळ घातला असल्याने, नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातच आज केज शहरातील मुख्य रस्त्यावर सोनार गल्लीत चार चाकी मधून आलेल्या तिघांनी शाळेत चाललेल्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही तरुणांनी हा प्रयत्न हाणून पाडला. अपहरण करणारा एक जण हाती लागला असून दोघे | पळून जाण्यात यशस्वी झाले. या थरारक घटनेने शहरात खळबळ उडाली असून बालके चोरणारी टोळी पडल्याची शहरात चर्चा सुरू झाली आहे. पकडलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून नेमका हा प्रकार काय ? हे तपासातून समोर येईल. मेन रोडने सकाळी १० च्या सुमारास एक विद्यार्थी सोनार गल्लीतून शाळेला जात होता. त्यावेळी अचानक एक चारचाकी वाहन आले. ते वाहन मुलाजवळ येऊन थांबले काही समजण्याच्या आत त्या विद्यार्थ्याला उचलून वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला असता घडलेल्या या अनुचित प्रकार विद्यार्थी घाबरुन ओरडू लागला तर हे पाहून बाजुला उभी असलेल्या महिलेनेही आरडाओरडा केली. हे ऐकून काही नागरिकांनी धाव घेतली तर दोघांनी दुचाकी चारचाकीच्या समोर लावली असता त्यांना पळता आले नाही. परंतु झटापटीत दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले तर एकजण जमावाच्या हाती लागला. त्यास जमावाने चांगलाच चोप दिला. भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने केज शहरात खळबळ उडाली आहे. या पकडलेल्या एक अपहरणकर्त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार नेमका काय ? हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. पण शहरात बालके चोरणारी टोळी पकडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.