जिजाऊ मल्टीस्टेटचा फरार आरोपीला बीड पोलिसांनी केली अटक !
बबन शिंदे मागील दिड वर्षापासून होता फरार

आनंद वीर (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यामध्ये मागील दीड वर्षापासून फरार असलेला जिजाऊ मॉ साहेब मल्टीस्टेटच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी बबन शिंदे याला अखेर बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावन परिसरातून बबन शिंदेला अटक करण्यात आली आहे. ठेवीदाराचे पैसे वेळेवर न दिल्याने ठेवीदारांनी अध्यक्ष बबन शिंदे सह संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून बबन शिंदे फरार होता.बीड मधील जिजाऊ मॉ साहेब मल्टीस्टेट घोटाळाप्रकरणात बीड जिल्ह्यात 3 तर धाराशिव जिल्ह्यात 2 गुन्हे दाखल आहेत. ठेवीदार गुन्हे दखल करण्याच्या प्रमाणात वाढ होत असून ठेवीदारांचे 159 कोटीची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीअसलेला बबन शिंदे मागील वर्षीच्या जुलैमहिन्यापासून फरार होता. त्याच्या शोधात ठिकठिकाणी पोलिस पथके कार्यरत होती मात्र सातत्याने आपली ठिकाणे बदलत, सीमकार्ड बदलत राहत होता. अखेर मुख्य आरोपी असलेल्या बबन शिंदेच्या बाबतीत बीड पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने वृंदावन मथुरा परिसरात तो वेश बदलून राहत असल्याचे समोर आल्यानंतर आर्थीक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचला. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनात आर्थीक गुन्हा शाखेच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे, पोलीस आमदार तुळशीराम जगताप, संजय पवार यांनी मोठ्या शिताफिने साधुच्या वेशात राहत असलेल्या फरार बबन शिंदेला बेड्या ठोकल्या आहेत.