मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली.
उपोषणाचा आठवा दिवस,धुळे सोलापूर महामार्गवर महिलांनी रोखला.

आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावी म्हणून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. शिंदे सरकारने सगेसोयरे बाबद फक्त घोषणा केली होती परंतु अंमलबजावणी केली नसल्याने, मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे तसेच आपल्या समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली.उपोषणाचा आज आठवा दिवस असल्याने मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दुपारपासून ढासळल्याने मराठा समाजासाठी चिंतेची बाब आहे. सरकारकडून कोणतेही शिष्ट मंडळ आली नाही किंवा आरक्षणाबाबत कोणती हालचाल राज्य सरकार करताना दिसून आले नाही. त्यामुळे मनोज जरागे पाटील यांची समर्थक झाले आहेत. उपोषण स्थळी जमलेल्या महिलांनी व नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावा यासाठी विनंती करून, सरकार विरोधात आक्रोश केला.आज दुपारी महिलांनी आक्रमक भूमिका घेत धुळे सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री येथे वाहतूक बंद पाडून रस्ता रोको देखील करत सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करत एक मराठा लाख मराठा घोषणा दिल्या.मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याने महाराष्ट्रातून मराठा बांधव मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीकडे जात आहेत.