ताज्या घडामोडी
चालत्या दुचाकीवर वीज पडून दोघांचा मृत्यू
हिरापूर,हिंगणी हवेली गावाजवळील दुर्दैवी घटना.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाने चांगलेच झोडपले असून,काही भागात,मंडळात तर अतिवृष्टी झाली त्यामुळे नद्या,नाल्या ओसंडून वाहत आहेत तर तलाव देखील ओव्हर फ्लो झाले आहेत.मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती परंतु चार दिवसापासून पुन्हा पाऊस, वारा सह विजांचा कडकडाट सुरू झाला.गेवराई तालुक्यातील अर्धा मासला गावातील दोन तरुण बीड कडून आपल्या गावाकडे जात असताना हिरापुर जवळ हिंगणी हवेली या गावाजवळ चालत्या दुचाकीवर वीज पडल्याने बाबूराव पिंगळे व लहू उध्दव खरात याचा मृत्यू झाल्याची घटना दि.२४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास दुर्दैवी घटना घडल्याने अर्धा मासला गावावर शोककळा पसरली.