जालना रोडला आले तळ्याचे स्वरूप,पावसाने चौका/चौकात वाहतूक कोंडी
न.प.चे पावसाळ्यापूर्वीचे नियोजन सपशेल फेल.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून समाधानकारक पाऊस होत शेतकरी तसेच बीड जिल्ह्यातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीऱ्याची चिंता देखील मिटली आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी अचानक संततधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांचे चांगली तारांबळ उडाली. बीड शहरातील बीड जालना रोड अश्विनी हॉटेल च बाजूला तळ्याचे स्वरूप आले होते. जालना रोड वरून शाहूनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर कमरे एवढे पाणी आल्याने यात दुचाकी अडकून पडल्या होत्या, याच चौकात एक विद्युत टीपी आहे त्या डीपीला पाणी लागल्याने पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पाण्यात अनेक दुचाकी अडकून बंद पडल्या होत्या.संततधार झालेल्या पावसाने,रस्त्यावर पाणी साचल्याने बीड शहरातील जालना रोड, माळीवेस, बार्शी रोड,साठे चौक,शिवराज चौकात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनाच्या लांब लांब रांगा लागल्या होत्या यावेळी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी या ठिकाणी दिसले नाही. जालना रोडवरील रस्ता पाण्याखाली गेल्याने तळ्याचे स्वरूप आल्याने “बीडचा विकास कसा ओसंडून वाहत आहे”असे नागरिक बोलत होते. बीड नगरपालिका ने पावसाळ्यापूर्वी केलेले नियोजन हे फेल झाले असल्याचा हा पुरावा आहे.