
आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे व शिंदे सरकारने दिलेला सगेसोयर याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी.यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते.सरकारकडून कोणीतेही शिष्टमडळ आले नाही.मागील आठ दिवसापासून सुरू असल्याने जरांगे पाटील यांची तब्येत खलावत चालली होती. मराठा समाज बांधव व महिलानी काल मनोज जरांगेे यांनी उपचार घ्यावेत यासाठी विनंती करून आक्रोश करत महिलांनी आक्रमक भूमिका घेत धुळेेे सोलापूर महामार्ग रोखला त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मराठा समाज बांधवाच्या विनंतीला मान देऊन आज पाच वाजता स्थगित करण्याची घोषणा केली.उपोषण स्थिगीत केल्यानंतर ते रुग्णालयात दाखल होतील. आंदोलन संपले नसून आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत समाज बांधवांनी एकत्र राहावे तसेच मला भेटण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन माध्यमाद्वारे जरांगेपाटील यांनी केले