
आनंद वीर (प्रतिनिधी)बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना ठाणे प्रमुखांना दिल्या.त्या अनुषंगाने शहरात सुरु असलेल्या हवाला रॅकेटला बुधवारी पोलीस अधीक्षकांनी मोठा दणका दिला.बीड शहरात हवाला ने काही व्यक्ती व्यापारी,दोन नंबरवाले हे हवालाने आपली रक्कम पाठवत असल्याची माहिती मिळाली असता बीड ग्रामीण आणि बीड शहरच्या पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत बीड शहरात तीन ठिकाणी छापे मारले असून हवालाची लाखो रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्यासोबतच हवाला रॅकेटसाठी वापरले जाणारे यंत्रे, मोबाईल देखील जप्त करण्यात आली आहेत.बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना सध्या पोलिसांनी लक्ष केले आहे. बीड शहरात हवाला रॅकेट कार्यरत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून बीड ग्रामीण आणि बीड शहर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी संयुक्त कारवाई केली. बीड शहराच्या कबाडगल्ली, डीपी रोडवरील धूत हॉस्पिटलजवळ आणि आणखी एकाठिकाणी हॉस्पिटल जवळ व ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. यात तिन्ही ठिकाणाहून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे बाळराजे दराडे, बीड शहरचे ए.पी.आय.राठोड, सिरसाट, मनोज परजणे, अश्फाक सय्यद यांनी ही कारवाई केली. सायंकाळी सात वाजेपर्यंत देखील पोलिसांची कारवाई सुरूच असून निश्चित रक्कमेची मोजने सुरु आहे.हवाला रॅकेटवर ही खूप मोठी कारवाई असल्याची माहिती मिळत असून बीड शहरात तसेच जिल्ह्यात हवालाचे जाळे मोठे असल्याचे या कारवाईत निष्पन्न झाले आहे.पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.