राजेभाऊ फड यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश.
सरकार बदलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.शरदचंद्र पवार

आनंद विर(प्रतीनिधी)आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना खिंडीत पकडण्यासाठी चक्रव्यू रचून परळी येथे लवकरच एक मोठी सभा घेणार आहेत. गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे यांची जावई, बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते राजेश (राजाभाऊ) फड यांचा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्यसभा खासदार फौजिया खान आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे, सरचिटणीस अदितीताई नलावडे, सरचिटणीस रवींद्र पवार, यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार साहेब म्हणाले की, सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो, त्यावर जो कोणी आवाज उठवतो, त्याचा आवाज दाबला जातो.राजेश फड शरद पवार यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, शरद पवार साहेब यांचे मी आभार मानतो त्यांनी मला पक्षात प्रवेश दिला. पीक विमा हा आमच्या परळी तालुक्यात 25 टक्के शेतकऱ्यांना मिळतो आणि बाकीचे 75 टक्के पिक विम्याची रक्कम वाटली जाते, पण आपली सत्ता आली तर तुम्ही याची चौकशी लावा, अशी मागणी राजेभाऊ फड यांनी शरद पवार यांच्याकडे केली. पक्ष प्रवेशाला आम्ही जेव्हा परळीमधून मुंबईसाठी निघत होतो तेव्हा आम्हाला आणि आमच्या गाडीला अडवलं आहे आणि ते घाबरलेले आहेत असेही फड यांनी सांगितले.राजेश फड पुढे म्हणाले, बराच निधी आमच्या परळीला मिळाला आहे, पण तो निधी कुठे गेला, या संदर्भातील माहिती माझ्याकडे आहे. त्यासंदर्भात मी लवकरच हायकोर्टात जाणार आहे. आताचे आमदार यांनी पवार साहेबांशी गद्दारी केली आहे आणि या आमदाराची परळीमध्ये अलीबाबा आणि 40 चोरची टीम आहे म्हणून फक्त त्याच लोकांचा विकास झाला आहे. परळी ते नागरिक, व्यापारी हे दहशतिखाली असून त्याना दहशतमुक्त करणार, मी शरदचंद्र पवार पक्षात जाणार आहे म्हणून पालकमंत्र्यांनी माझं पोलीस संरक्षण काढून घेऊन माझ्यावर गुन्हा दाखल केला. कोणाचा हे नाद करा पण पवार साहेबांच्या नाद करू नका, येथे निवडणुकीत काय परळी मध्ये काय बदल होतो, हेच बघा असे राजेभाऊ फड म्हणले. परळीतील कार्यकर्ते नेते हे पवाराच्या संपर्कात असल्याचे सांगत सभी वेळी भव्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे.परळीतील येत्या निवडणुकीत बदल निश्चित होणार असे ठामपणे रजेभाऊ फड यांनी सांगितले