ताज्या घडामोडी
बस स्थानक,आगार पाण्याखाली बसचे कामे खोळंबली.
बीड शहराला पावसाने झोडपल्याने काही भागाला आले तळ्याचे स्वरूप

वीर(प्रतिनिधी)बीड जिल्ह्याला मागील काही दिवसापासून संततधार पाऊस झाला तर काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे.काल दुपारी अचानक जोरदार पावसाची सुरुवात झाल्याने पावसाने बीड शहराला झोडपून काढल्याने बीड शहरातील जालना रोड पाण्याखाली गेला, शाहूनगरकडे जाणारा रस्ता काही काळ बंद झाला, त्या पाण्यात अनेक वाहनधारक व वाहने अडकून पडली होती.या पावसाने बीड बस स्थानकतील आगारांला तळ्याचे स्वरूप आले. त्यामुळे दुरुस्ती,मेंटेनेससाठी आलेल्या बसला दुरुस्त करण्यासाठी तेथील कामगारांना अडचणी येत असून,काम करण्यासाठी लागणारे साहित्य पाण्यात गेले आहे. त्यामुळे बस आगारातील अनेक बस उभ्या आहेत.