
बीड. बीड शहरातील बार्शी नाका भागातील प्रकाश आंबेडकर येथे रहिवासी चेतन चक्रे वय ३२ वर्षे. यांचे आज दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता दुःखद निधन झाले.चेतन चक्र है रि.पा.ई.चे कट्टर समर्थक व रिपाई युवा शहर प्रमुख होते.रिपाई बीड जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे यांचे ते कट्टर समर्थक व निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.त्यांना दोन वर्षापासून आजाराने ग्रासल्याने ते घरीच उपचार घेत होते,परंतु मागील आठ दिवसात त्यांचे प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.री.पा.ई. च्या विविध कार्यक्रम,आंदोलनात चेतन चक्रे यांचा सक्रिय सहभाग होता.आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून दुपारी ३ वाजता भगवान बाबा जवळील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.रिपाईचा एक लढवय्या, सच्चा कार्यकर्ता,मित्र अचानक निघून गेल्याने नातेवाईक,मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात हळूहळू व्यक्त होत आहे.