गुटखा विकणाऱ्यावर बीड शहर पोलिसांची कारवाई
बंदी असताना देखील बीड शहरात खुलेआम गुटखा विक्री.

वीर(प्रतिनिधी) तंबाखूजन्य पदार्थ,गुटखा यामुळे मानवास कॅन्सल सारखे रोग होत असल्याने महाराष्ट्रात गुटखा बंदी कायदा करून तंबाखूजन्य पदार्थ तसेच बुटक्यावर बंदी केली. गुटक्यावर बंदी असताना देखील बीड जिल्ह्यात, शहरात मात्र सर्रास, खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे दिसत आहे. यावर अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन डोळे झाक करत आहे. मागील काही दिवसांमध्ये गुटखा वर कारवाया थंडावल्या आहेत. परंतु काल दिनांक २६ सप्टेंबर पासून बीड शहर पोलीस अधिकाऱ्यांनी गुटख्यावर कारवाई करण्यास सुरू केले आहे.आज सकाळी बार्शी रोडवरील “गोल्डन” टपरीवर धाड मारून कारवाई करण्यात आली व टपरी चालकाकडून दंड वसूल करण्यात आला.शहरात गुटख्यावर अचानक सुरू झालेल्या या कारवाईने गुटखा विक्रेत्यात खळबळ उडाली.बीड शहरातील शाळा,महाविद्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयाच्या जवळ गुटखा विकणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.